अहमदनगर : मनपा आयुक्त श्री मायकलवार  यांनी  अल्पसंख्याक प्रबोधन मंचाची यंत्रणा वाढविण्याची  मागणी तातडीने  मंजूर करत  आरोग्य विभागात विविध पदांवर भरती साठी  जाहिरात प्रकाशित केली आहे.   दोनच दिवसांपूर्वी मंच चे अध्यक्ष पत्रकार सय्यद वहाब यांनी मा आयुक्तांना भेटून  आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचे निदर्शनास  आणून दिले होते.  मा आयुक्त मायकलवार  यांनी या विषयी  दिलेला शब्द पाळून  त्वरित  यंत्रणा विस्तार सुरू केला असून  मनपा  रिक्त पदांवर  डॉक्टर, नर्सेस,व इतर टेक्निशियन यांची  तातडीने भरती करणार आहे.   या प्रकरणी  पत्रकार सय्यद वहाब यांनी  आयुक्तांचे आभार मानले आहेत.