
अहमदनगर (दि ३० जुलै २०२०) : बकरी ईदच्या पार्शवभूमीवर अहमदनगर पोलीस दला तर्फे रूट मार्च काढण्यात आला कोरोनाचे सावट कमी होत नाही आणि त्यामुळे पुढील ईद, गणेशोत्सव आणि इतर सण साध्या पद्धतीने सोशल डिस्टंसिन्गचे पालन करत मास्कचा वापर करत आणि नियमांचे पालन करत सण साजरे करावे असे यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी माध्यमांशी बोलतांना अहमदनगर शहर वासियांना संदेश दिला. शहरातील झेंडीगेट भागातून हा रूट मार्च पोलिसांनी सुरु केला आणि त्यानंतर संपूर्ण शहरातून हा मार्च गेला यावेळी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या सोबत पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक,रॅपिड action फोर्स आणि सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.




