
लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या वेबसाइटवरून अर्ज करायचा असून, त्यासाठी आधी छायाप्रत घ्यावी लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरम्यान, या mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. यावर्षी राज्याचा निकाल ९५.३० टक्के इतका लागला आहे. तर यावर्षी कोकण विभागानं बाजी मारली आहे.वेबसाइटवर निकाल पाहता येईल. त्याचप्रमाणे प्रिंटदेखील घेता येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या वेबसाइटवरून अर्ज करायचा असून, त्यासाठी आधी छायाप्रत घ्यावी लागणार आहे. गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहे.
विभागीय निकालांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली
विभागीय निकालांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के लागला. तर सर्वात कमी निकालाची नोंद औरंगाबाद येथे (९२.० टक्के) झाली. पुणे विभागाचा निकाल ९२.५० टक्के लागला. यंदाही विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना मागे टाकले. राज्यभरातून ९६.९१ टक्के विद्यार्थिनी तर ९३.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३.०१ टक्के अधिक विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. परीक्षा दिलेल्यांपैकी ९२.७३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
