२९ जुलै पुण्यतिथी निमित्तानं काही आठवणी!

   एका खेड्यात रेल्वेने प्रवास करून स्टेशन वर उतरल्यावर बाहेर जातानां गेटवर टि.सी. टिकिट मागतो, टिकीट प्लिज़ म्हणतो,”पहले गुड मॉर्निंग,फिर टिकिट, टि.सी. गुड मॉर्निंग, करतो,थॅंकयु, मुझसे मिलिए मै हुं प्रेस रिपोर्टर,बम्ब्ई से आया हुं ,लो तुम्हेतो बम्ब्ई भी नहीं मालुम होंगी.आणी मग सुरू  होती नया दौर या चित्रपटात जॉनी वाकर यांची कॉमेडी.ऊत्तम संवाद कौशल्य,व कुठल्याही आक्षेपार्य ( व्हलगर) संवादा, हावभाव शिवाय.  या जगात अनेक प्रसिद्ध कलाकार होवून गेले, निसर्गांने वेगवेगळ्या कला गुण दिल्या व त्यांनी त्याच्यावर खुप परिश्रम केले प्रसिध्दी मिळविली. कॉमेडीही एक मोठी कला असुन अनेक कॉमेडीयन होवून गेले ऊ. हिंदी चित्रपटात किशोरकुमार, गोप, मुक्री,याकुब,नुरमोहमद चार्ली, महेमुद इत्यादींमध्ये नेहमी प्रथम क्रमांकावर राहणारे  बद्रोद्दीन जमालोद्दीन काज़ी “जॉनी वाकर”.     

   वास्तविक जॉनी वाकर यांचे पुर्वज संगमनेरचे.मात्र जिरायत शेती गरिबी मुळे वडील जमालोद्दीन काज़ी हे नोकरीस ईंदौर येथे गेले व तेथे टेक्सटाईल मिल मध्ये विव्हींग मास्टर म्ह्णुन काम करायला सुरुवात केली.तेथेच जॉनी वाकर यांचा जन्म झाला तेथे त्यांचा प्राथमिक शिक्षण सहावी पर्यंत झालं, मात्र काही वर्षांतच वडिलांची मिल बंद पडली व त्यांची संपूर्ण फॅमिली परत संगमनेरला आली.येथे बरेच वर्ष राहिल्यानंतर रोजगारासाठी ते मुंबईला गेले तेथे जॉनी वाकर यांनी बेस्ट मध्ये कंडक्टरची नोकरी करतांना पार्ट टाईम मध्यें भाजी,फळे व कुल्फि विकली खुप परिश्रम केले, कंडक्टर असतांनाच त्यांची नैसर्गिक कला “कॉमेडी”चा  पुरेपुर उपयोग केला,अनेक प्रवाश्यांबरोबर अभिनेते बलराज साहनी ही प्रवास करायेचे.त्यांना जॉनी वाकर यांची कॉमेडी खुप आवडायची.एकदा सांगितले की,आपण कॉमेडी खुप सुंदर करता, चित्रपटात काम करता का? जॉनी वाकर खुप खुष झाले.तेव्हां बलराज साहनी यांनी गुरु दत्त यांच्या कडे गेले व दारुड्या ची एक्टींग करण्यास सांगितले ज्या माणसांने कधी दारुला स्पर्श ही केला नाही तो माणूस एवढी सुंदर एक्टींग करु शकतो,गुरु दत्त यांचा विश्वास बसेना! नवकेतन फिल्म्स निर्मित१९५१मध्ये “बाज़ी”या चित्रपटात देव आनंद बरोबर कामाची संधी मिळाली व त्यांचा नांव बद्रोद्दीन काज़ी वरुन जॉनी वाकर झाले.दारुडया ची एक्टींग एवढी आवडली की,बिमल रॉय यांनी ‘मधुमती’ मध्ये दिलीप कुमार बरोबर दारुड्या नोकर ची भुमिका दिली या चित्रपटात एका गाण्यात “जंगल मे मोर नाचा किसी न देखा एक हम पिके ज़रा झुमे सबने देखा” प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरला, व ५८ वा उत्कृष्ट साह्यक अभिनेतेचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला.

सुरूवात त्यांची १९४८ मध्ये “आखरी पैगाम” या चित्रपटातुन  छोटी भुमिकेने झाली. “बाज़ी” नंतर त्यांना कॉमेडी च्या एका मागे एक भुमिका मिळत गेले  मधुमती, सि.आय.डी.,आरपार,छुमंतर, चौधवी का चांद, मुगलेआज़म,मिस्टर ॲंड मिसेस ५५,मेरे महबुब, आनंद, ईत्यादी व ते सुपरहिट होत गेले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत गेले.”त्यांनी ३००हुन अधिक चित्रपटात काम केले, सर्वाधिक १३चित्रपटात त्यांनी दिलीप कुमारांबरोबर काम केले.” श्रीमंत मेहुणा पाहिजे” या मराठी चित्रपटात सुध्दा विनोदी भूमिका केलेली आहे. अभी अभी यहीं था किधर गया दिल”, ज़रा हटके ज़रा बचके ये है बॉम्बे मेरी जान, हे सर्व गाणी त्यावेळच्या “बिनाका गितमाला” मध्ये टॉप मध्ये चालतं असे,व रेकॉर्ड विक्री मध्ये ही टॉप मध्ये चालत होते.चंपि मालिश, सर तेरा चकराय या दिल डुबा जाये हा गित तर आजही हिट आहे कारण बिग बी च तेलाच्या  जाहिराती मध्ये झळकतो! जॉनी वाकर यांच्यात अनेक कला गुण होत्या.गित चित्रित करतांना त्यांनी (लिप मुव्हमेंट) ओठांच्या हालचाली गित गाऊन न करता ते आपल्या मर्जीनुसार काही तरी गाऊन करायचे,हि कला पुर्ण चित्रपट इंडस्ट्रीत त्यांच्यात होती.
     स्वता:च्या नावांने सिनेमात टायटल असणारे फिल्मी दुनियेत अत्तापर्यंत “मधुबाला” व “जॉनी वाकर यांनाच हा सन्मान मिळाला आहे.

एका कार्यक्रम निमित्त जॉनी वॉकर संगमनेरला आले असता त्यांच्या सोबत शेख मो.ईदरीस मो.शफी,अस्लमअहमद,अहमदनगरचे निज़ाम जहाँगीरदार आदी

  ‘संगमनेरशी घट्ट नातं’

१९६२ मध्ये अंजूमने ईस्लाम यतीमखाना (अनाथालय) च्या नवीन इमारतीचे उद्घाटनासाठी त्यावेळच्या पुरवठा मंत्री श्री काज़ी साहेब यांच्या बरोबर जॉनी वाकर यांना प्रमुख पाहुणे म्हणुन निमंत्रण द्यायचा, त्यावेळी मुळचे संगमनेरचे मात्र मुंबईत स्थायिक झालेले संस्थेचे तात्कालिन चेअरमन श्री जिलानी शेठ (शेख जिलानी शमशोद्दीन, रिज़वान जिलानी, हार्डवेअर) यांचे व जॉनी वाकर यांचे खुप जवळचे संबंध व विश्वासू होते. जॉनी वाकर यांना पाचारण करण्यासाठी जिलानी शेठ यांनी खुप परिश्रम घेतले होते. जिलानी.सेठच संगमनेर येथील त्यांच्या प्रॉपर्टीचे टॅक्स भरणे ई. कामे करत होते.त्यांच्या भोजनासाठी बिर्याणी ची मेजवानी दिली असता जॉनी वाकर यांनी सांगितले कि मला येथील बाजरी भाकर व हिरवी मिरची चटणी खुप पसंत आहे बिर्याणी तर मला रोजच मिळते. 

Kamal Hasan & Johny Walker In Film Chachi 420

   तसेच १९९५ मध्ये हि अॅड. हैदर बेग यांनी अॅंग्लो ऊर्दू हायस्कूलच्या मदती साठी भरगच असा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळीही जॉनी वाकर यांनी सांगितले”मेरे अपने गावं मे अबभी मेरी ईतनी इज़्जत और कदरदानी की जा रही है मुझे ईस पर तहाज्जुब भी हो रहा है और दिलसे खुषी भी हो रही है.”निंबाळे येथे त्यांचे जेवण होऊन त्यांना संगमनेर खुर्द येथे दर्गाच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी सांगितले,माझे खुप जवळचे नातेवाईक येथे त्यांचे कबरी आहे,आज त्यांचेही दर्शन झाले खुप समाधान. झालं.जॉनी वाकर जेवढी सुंदर त्यांची कॉमेडी, तेवढीच सुंदर त्यांची व्यक्तीमत्व. त्यांच्या बरोबर दिवसभर सोबत मी सय्यदअस्लमअहमद,अहमदनगरचे,निज़ाम जहाँगीरदार ई.मित्र मंडळ होतो, त्यांच्यात. अहंकार अजिबात नव्हता.ज्या व्यक्ती कडे रोल्स रॉईस सारखे कार होती, तो व्यक्ती राहणीमानात अत्यंत साधा, साधा कुर्ता पायजम्या वर आपल्या गावी आले याच्यावर विश्वास बसेना!२९जुलै२००३रोजी अल्पशा आजाराने जॉनी वाकर यांनी आपल्या फॅन्सनां कायमचा अल्वीदा केले.


संकलन आणि लेखन = शेख मो.ईदरीस मो.शफी

अध्यक्ष जे.यु.सी. संगमनेर

मो.9890524092