
अहमदनगर (दि २९ जुलै २०२०) : अनेकवेळा भूमिपूजन आणि अनेक वेळा उदघाटनाची कार्यक्रम करून उड्डाणपूल काम सुरु होण्याच्या बातम्या नगरकरांनी मागील १० ते १२ वर्षांपासून अनेकवेळा ऐकल्या आहेत आणि अनेकवेळा भूमिपूजना नंतर उड्डाण पुलाचा खडा हि हालत नसल्याचे नगरकरांना नवे नाही त्यात आता नव्या उदघाटन कार्यक्रमाची भर पडते कि प्रत्यक्ष काम सुरु होते याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. खासदार सुजय विखेंनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आज पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते प्रत्यक्ष कामास सुरवात झाली आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या कामाचे पूजन केले व पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी नारळ फोडला. द्विवेदी यांनी बोलताना आता या रस्त्यावरील रखडलेल्या उड्डणपुलाचा प्रश्न मार्गी लागला असून, हा उड्डाणपुल पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले. या प्रसंगी प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, दिग्विजय पाटणकर, मुजीब सय्यद, शाखा अभियंता श्रीकांत लोखंडे, ठेकेदार दिनेश अग्रवाल, गजानन शेळके, अण्णा चौधरी आदी उपस्थित होते.
सक्कर चौक ते चांदणी चौक अशा दीड किमी अंतरावर हा उड्डाणपूल उभारण्यासाठी 327 कोटींचा प्रकल्प आहे.नगर शहरातील उड्डाणपुलाचे प्रश्न दहा वर्षांपासून प्रलंबित होता. हा उड्डाणपूल सक्कर चौक ते नवीन महानगरपालिका असा सात किमीचा करण्याचा प्रयत्न खासदार दिलीप गांधी यांनी केला. अनेक वेळा या उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले परंतु, प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही.पण खा.सुजय विखे यांनी उड्डाणपुलात लक्ष घातल्यापासुन या कामास वेग आला. या उड्डाणपुलाबाबत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर सुजय विखे यांनी अनेक बैठका घेतल्या. नगर शहरातून जास्त अंतराचा उड्डाणपूल करण्यासाठी जास्त निधी लागणार होता.त्यामुळे उड्डाणपूल होऊ शकत नाही. त्या पेक्षा सक्कर चौक ते चांदणी चौक असा दीड किमीचा उड्डाणपूल करण्याचे निश्चीत करण्यात आले. हा उड्डाणपूल चारपदरी असणार आहे. या उड्डाणपुलासाठी 327 कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला.
शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग अखेर खा. सुजय विखेच्या प्रयत्नांमुळेचं मोकळा झाला आहे. संरक्षण मंत्र्यालयाकडून याबाबतीत ना हरकत प्रमाण पत्र प्राप्त झाले. संरक्षण मंत्रालयाकडून प्रतीक्षेत असलेले ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने उड्डाणपुलाच्या कामासाठी केवळ नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाला वर्क ऑर्डर काढण्याची औपचारिकता शिल्लक होती ती ही पुर्ण करण्यात आली.उड्डाणपुलाच्या कामासाठी संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे होते. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हा प्रश्न येत असल्याने केवळ अहमदनगरच्या उड्डाणपुलाला सोयीचे व्हावे म्हणून देशाचे धोरण अनुकूल करण्यात आले.त्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण दलाच्या अधिकार्यांसमवेत घेतलेल्या बैठकीची ही फलनिष्पत्ती आहे. या उड्डाणपुलामुळे अहमदनगर-औरंगाबाद व अहमदनगर-पुणे या मार्गांवरील दळणवळण वाढून नगरच्या विकासास हातभार लागणार आहे. शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला .संसदेच्या अधिवेशनादरम्यान खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण पूलाच्या व अन्य राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून नगर शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष वेधले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची वैयक्तिक भेट घेवून खा.डॉ विखे यांनी नगर शहरातील उड्डाण पुलासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जमीनीच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती केल्यानंतर या कामास वेग आला.आज अखेर या उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
