
अहमदनगर : दिनांक 27 जुलै ते 29 जुलै 2020 दरम्यान रोज संध्याकाळी पाच ते साडे सहा या वेळेत सुखी पालकत्व व हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे :-
दिनांक 27 जुलै रोजी *संगमनेर येथील डॉ.संजयजी मालपाणी*
ज्यांनी चाईल्ड सायकाँलाँजीमध्ये डॉक्टरेट मिळविली आहे ते
*दोन शब्द आईसाठी; दोन शब्द बाबांसाठी*

या कार्यक्रमात पालक म्हणून आपली जबाबदारी काय? या विषयावर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शक्यतो मुले सोबत नसावीत.
दिनांक 28 जुलै रोजी *मुंबई येथील प्रियाजी सुशांत शिंदे* या
*यशस्वी पालकत्वाची गुरुकिल्ली*

या विषयावर पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक 29 जुलै रोजी *सातारा येथील पर्यावरण प्रेमी अँन सौ.गीताजी मामनिया* या विद्यार्थ्यांना
*आपला बाप्पा आपण बनवा*

इकोफ्रेंडली गणेश बनविण्याचे प्रशिक्षण देणार आहेत.
*तसेच सोलापूर येथील प्रसिद्ध हस्तकला प्रशिक्षक सौ नैनाजी बूब या*

*विद्यार्थ्यांसाठी हस्तकला*
याची कार्यशाळा घेणार आहेत.हा कार्यक्रम सर्वांसाठी निशुल्क आहे, मात्र त्यासाठी https://forms.gle/mDKcV7w6sT9ADJ1h8 या लिंक वर क्लिक करून अथवा या 8485864454 या व्हाट्सअप क्रमांकावर नावनोंदणी करावी लागेल. त्यानंतर या कार्यक्रमाची फेसबुक लाईव्ह ची लिंक आपल्याला पाठवली जाईल. लॉकडाउनच्या काळात आपण सर्वांना सकारात्मक विचारसरणीसाठी प्रेरक, अशा या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी रोटरी इंट्रा.क्लब ऑफ अहमदनगर चे अध्यक्ष रफिक मुन्शी, सचिव सुयोग झंवर आणि प्रकल्प प्रमुख डॉ रिझवान अहमद यांनी केले आहे.

