
अहमदनगर (पारनेर दि २४ जुलै २०२०) : ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून अधिकरी नेमावा याबाबत त्यांनी राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. दुसरीकडे या कोरोनाच्या परिस्थितीत अधिकारी उपलब्ध नसल्याने मंडलाधिकारी व कामगार तलाठी ग्रामसेवक यांच्यासह इतर शासकीय अधिकारांची नियुक्ती करावी.प्रशासक म्हणून जर पक्ष व पार्टी यांना स्थान दिले तर उद्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या पडसाद उमटून हाणामारी व मारामारीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होवुन गावागावातील सामाजिक स्वाथ्य बिघडेल असे मत ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.

त्यामुळे पक्ष व पार्टीचा प्रशासक म्हणून जर नियुक्ती केली असती त्याचा डोळा हा शासकीय पैशाकडे लागला असता. त्यातुन गावागावात भांडणे व मारामारीच्या घटना होतील हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पटले आहे.त्यामुळे या अर्धा तासाच्या चर्चेत माझे निम्मे समाधान झाले असल्याचे प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.७३ व्या घटना दुरुस्ती मध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असुन ग्रामीण भागात पक्ष व पार्टी याला फार महत्व देवु नये. त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक पक्ष व पार्टी आणुन सत्तेचे केंद्रीकरण करता हे चुकीचे आहे. तर दुसरीकडे राज्यापालांनी जो प्रशासकाबाबत अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये कुठेही पालकमंत्र्याची शिफारस अथवा पक्ष पार्टी याचा कुठेही उल्लेख नाही ते तुम्ही का करता असे म्हणता त्यांनी हा अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची कबुली दिली आहे.तर दुसरीकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले राज्यातील ग्रामीण भागात ग्रामविकासाचे मार्गदर्शन मिळावं यासाठी मी अण्णा हजारेंच्या भेटीला आलो आहे. तर दुसरीकडे प्रशासकावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जी नाराजी व्यक्त केली होती त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. उच्च न्यायालयात जे प्रकरण आहे या प्रशासकाबाबत संपुर्ण माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिली आहे. त्यामुळे सोमवारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल असेही म्हणाले. तर नगर जिल्ह्यात अद्याप कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात असुन जिल्हामध्ये लाॅकडाऊन गरज नाही असेही पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहे.
