अहमदनगर (दि २३ जुलै २०२०) : कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट यायला सात ते आठ दिवस लागतात याचे कारण विचारल्यास सांगितले जाते की आमचा काही दोष नाही जिल्हा रुग्णालय उशिरा रिपोर्ट देतात छावणी परिषद क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या रुग्णांकडे कडे पूर्णत: दुर्लक्ष करत आहे. क्वारंटाईन ठेवलेले रुग्णांना छावणी परिषदचे डॉक्टर तपासणीसाठी वेळेवर जात नाही. ज्या नागरिकांना होम क्वारंटाईन केले त्यांना तर डॉक्टर तपासायला सुद्धा जात नाही.छावणी परिषदचे निष्काळजीपणामुळे भिंगार वासियांचा जीव धोक्यात आलेले आहेत.

भिंगारच्या नागरिकांचा जीव पूर्ण धोक्यात आलेला आहे

अशावेळी या होम क्वारंटाईन नागरिकांना कोण सांगणार तुम्हाला काही आजार आहे का नाही तुम्ही कोरोना बाधित आहे का नाही असा विचार या होम क्वारंटाईन नागरिकांच्या मनात येत आहे. येथे कॅन्टोन्मेंट झोनमध्ये सहजपणे नागरिक येऊन जाऊ शकतात तेथील पत्रे देखील असे लावलेले आहेत की नागरिक तिथून येऊन जा करू शकतात व तेथे कोणतेही अधिकारी पोलीस प्रशासन लक्ष देत नाही. अशा अवस्थेत भिंगारच्या नागरिकांचा जीव पूर्ण धोक्यात आलेला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही छावणी परिषदांच्या प्रशासन हद्दीत भरपूर प्रयत्न करतोय.छावणी परिषद कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे छावणी परिषद कार्यालय ही बंद केले असून कृपया नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे.

विद्याधर पवार, छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी