लखनौ (वृत्तसंस्था) (दि २० जुलै २०२०) : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये ठार केलेल्या पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. पोलिसांची गाडी पलटल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना विकास दुबेचा एसटीएफने १० जुलैला सकाळी खात्मा केला होता. या चकमकीत विकास दुबेच्या शरीरातून बंदुकीच्या तीन गोळ्या आरपार झाल्या होत्या. रिपोर्टमध्ये विकास दुबेच्या शरिरावर १० जखमांच्या खुना आढळून आल्या.या जखमा ६ गोळ्या लागून झालेल्या होत्या. तर अन्य चार जखमांच्या खुना पळून जाताना झाल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, विकास दुबेच्या उजव्या खांद्याच्या आणि छातीच्या डाव्या बाजूने दोन गोळ्या आरपार झाल्या होत्या. त्याशिवाय, तीन गोळ्यांचे एन्ट्री पॉईंट मिळाले आहेत. विकास दुबेवर गोळ्या किती दूर अंतरावरून झाडण्यात आल्या होत्या, याचा उल्लेख रिपोर्टमध्ये नाही. परंतु, पोस्टमार्टममधून एक गोष्ट स्पष्ट झाली की, विकासने एसटीएफचा सामना केला होता. कारण, सर्व गोळ्यांचे एंट्री पॉईंट समोर आहेत उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबेला ठार केलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, एसटीएफची टीम त्याला उज्जैनहून कानपूरला घेऊन येत होती. तेव्हा कानपूर नजीक एसटीएफची गाडी पलटली.त्यानंतर विकास दुबे पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळू लागला. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले होते.तरीही त्याने ऐकले नाही. त्यावेळी विकासचा एन्काऊंटर करण्यात आला होता.