औरंगाबाद : करोनामुळे दोन दिवसात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून शिवसेना कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत. नितीन साळवे आणि रावसाहेब आम्ले अशी या नगरसेवकांची नावं शिवसेनेचे उत्तम नगर बौद्धनगर वॉर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी यांचं मंगळवारी निधन झालं. करोनाची लागण झाल्याने नितीन साळवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. २६ जून रोजी एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण मंगळवारी उपचारा दरम्यानच त्यांचं निधन झालं.  तर दुसरीकडे शिवसेनेचे पडेगावचे माजी नगरसेवक रावसाहेब आम्ले यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यांना प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. पण त्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्यांचं निधन झालं.