गुन्हे मागे घेण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे मुख्यमंत्र्याना साकडे

अहमदनगर- औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी दिव्य मराठी विरोधात दाखल केलेले गुन्हे हा माध्यमांवर  दहशत निर्माण करण्याचाच प्रकार असून  हा आताताईपणा असल्याच्या शब्दात सुधीर मेहता यांनी अधिकार्याचा निषेध केला.  माध्यमे या दबावतंत्राचा बॅनरचा विचार न करता एकजुटीने आणि संघटीतपणे मुकाबला करतील. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हे गुन्हे रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करतानाच या अधिकारी आणि प्रशासनाला हा उद्दामपणा महागात पडेल, अशा शब्दात  राष्ट्रीय पत्रकार महासंघ नवी दिल्ली चे  महासचिव सुधीर मेहता यांनी या अधिकार्यांना इशारा दिला आहे. उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेल्या अधिकार्यांचा अहंकार आणि संयमाचा  अभाव याबाबत फटकारल्यानंतर खरे तर प्रशासन आम्ही कसे काम करतोय वगैरे सांगु शकले असते. ‘सर्वाना विश्वासात घेउन कोरोनाशी लढतोय’ म्हणाले असते तरी आमच्या माध्यमांनी त्यांचे खुलासे छापले असते.  अगदी नेहमीप्रमाणे सोइस्करपणे मुग गिळून गप्प बसले असते तरी चालले असतेच, मात्र थेट  माध्यमावर गुन्हे दाखल करण्याचे आणि भास्कर ग्रृपच्या दैनिकावर. धाडस या  अधिकार्यामध्ये आले कुठुन असा सवाल करुन या अधिकार्यावर तातडीने  कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय पत्रकार महासंघाने केली आहे. आपण यासंदर्भात  गृहमंत्री अनिल देशमुख आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाच कारवाईसाठी साकडे घालणार असल्याचे सुधीर मेहता यांनी सांगितले. प्रसार माध्यमे अतिशय जबाबदारीने कोरोना संकटात सरकारला साथ देत आहेत. विशेषत: वर्तमानपत्रांनी अतिशय सकारात्मक भुमिका घेतली आणि जनतेला आधार मार्गदर्शन होईल, अशीच जबाबदारी वृत्तपत्रांनी पार पाडली. मात्र प्रशासनाची भुमिका अडवणुकीचीच. अनेक ठिकाणी दिसून आली याची अनेक उदाहरणे पुराव्यासह देता येतील. काहीनी तर आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे सामान्य जनतेच्या अडवणुकीसाठी इष्टापत्तीच मानली. आणि याच अहंकारावर दिव्यमराठीने जनतेच्याच भावना मांडल्या उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले असतानाही अधिकारी माध्यमांविरुध आतताई टोकाची भुमिका घेत असतील तर  सरकारला एका वेगळ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुधीर मेहता यानी दिला .राष्ट्रीय पत्रकार महासंघ महाराष़्ट्र शाखा यासंदर्भात खोटे गुन्हे दाखल करणार्या अधिकार्यांवर कारवाईसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करेल, असे प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुधीर मेहता यांनी सांगितले. राष्ट्रीय पत्रकार महासंघ नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्षा रुणू हजारिका आनि चेअरमन सुरेश कदम  देशभरातून प्रसारमाध्यमे ज्या अडचणींचा सामना करत आहेत याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधणार  आहेत. जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असलेल्या सर्वच  प्रसार माध्यमांबरोबर  सर्व मार्गाने उभा राहील, असे चेअरमन सुरेश कदम यांनी स्पष्ट  केले.  सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत तर माहिती अधिकार, न्यायालय सर्वच मार्गाने  राष्ट्रीय पत्रकार महासंघ आक्रमक भुमिका  घेईल, असे सुधीर मेहता यांनी स्पष्ट केले.