संगमनेर (प्रतिनिधी ) : ऊर्दू भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी व शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात जिल्हाभर प्रसिद्ध असलेली जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरच्या आठव्या वर्धापनदिना निमित्ताने कोरोना विषाणूचा धोका बघता, सावधगिरी म्हणून येथील नामवंत संस्थांना, सामाजिक जाणिवेतून सॅनिटाईजर किटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार किसन हासे, शिवपालसिंह ठाकुर, राजेन्द्रसिंह चौव्हान,   भारत रेघाटे यांना सॅनिटाईजर किट देण्यात आली. तर समनापूर येथील जि.प. ऊर्दू व मराठी प्राथमिक शाळेस मुख्याध्यापक शेख महेमुद अहमद किट संस्थेचे सोशल अडव्हाईजर अब्दुल्ला चौधरी, संस्थेचे अध्यक्ष शेख ईदरीस, कार्यध्यक्ष सय्यद असिफ अली यांच्या हस्ते आदि संस्थांना सॅनिटाईजर देण्यात आले. या प्रसंगी हुस्टन अमेरिका येथुन ऊर्दू शायर व साहित्यिक के.सी. खुराना तसेच मुंबईचे माजी पोलीस अधिकारी श्री सय्यद दिलावर,न्यु चांद सुलताना ऊर्दू हायस्कूल चे चेअरमन शेख राजमोहंमद यांनी वर्धापन दिनानिमित्ताने शुभ संदेश दिले आहे यानिमित्ताने श्री रशीद गुरुजी,शानु बेगमपुरे,शानु बागवान दस्तगीर शाह इत्यादी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.