
भारतरत्न राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फौऊंडेशनच्यावतीने कोवीड-१९ मधे उत्कृष्ट सहभाग घेऊन जनतेची चांगली सेवा केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ता अलतमश सलीम जरीवाला यांचे सन्मानपत्र देऊन गौरव
अहमदनगर : रामेश्वरम येथील “कलाम हाऊस” येथे असलेल्या महामहीम राष्ट्रपती, मिसाईल मॅन, स्वर्गीय, एपीजे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फौऊंडेशन च्या तमीलनाडु राज्यातील आंतरराष्ट्रीय कार्यालयातुन देशभरात कोवीड-१९ साठी “कोरोना वीर” म्हणुन देशातील नागरिक जनतेची सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे. यामधे अहमदनगर शहरातील पिरशाह खुंट येथील अहमदनगर युवा फौंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता, अलतमश सलीम जरीवाला यांना प्रमाणपत्र बहाल करण्यात आले असुन कोरोना वायरस लॉक डाऊन काळात अहमदनगर युवा फौंडेशनच्या वतीने हजारो गरीब गरजुंना रेशनिंग साहित्य, अन्न धान्य मोफत वाटप करण्यात आले आहे. तसेच कोरोना काळात अनेक नागरिकांना मोफत समोपदेशन करुन कोरोना संदर्भात जन जागृती अभियान राबविण्यात आले आहे. आणि याचाच भाग म्हणून अहमदनगर युवा फौंडेशनचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ता अलतमश सलीम जरीवाला यांना हे प्रमाणपत्र महामहीम राष्ट्रपती स्व.एपीजे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय फौऊंडेशन, रामेश्वरम, तमीळनाडु यांनी बहाल केले आहे. कोवीड-१९ संदर्भात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अनेक नावाजलेल्या सामाजिक संस्थांनी अलतमश सलीम जरीवाला यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने इन्सानियत चैरिटेबल ट्रस्ट, म्हैसुर-कर्नाटका, छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य, सवेरा फाउंडेशन पुणे, करुणा फाउंडेशन नाशीक, राज्य युवा परिषद – महाराष्ट्र, जनशक्ति विकास संघ, पुणे जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम नागपुर, भारतीय महाक्रांती सेना, स्वामी फाउंडेशन, पुणे, मातृभुमी स्वयंसेवक सेना पुणे, मानवता हिताय सोशल फाउंडेशन, सहारा युथ फाउंडेशन अहमदनगर व आदीं संस्थाचा समावेश आहे.
