
औरंगाबाद, दि. 27 : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 201 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यामधील 125 रुग्ण मनपा हद्दीतील,76 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामध्ये 114 पुरूष, 87 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 4723 कोरोनाबाधित आढळले असून 2373 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 234 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2116 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.औरंगाबाद मनपा क्षेत्रांतर्गत आढळलेल्या

रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
लेबर कॉलनी परिसर (1), नंदनवन कॉलनी (1), आंबेडकर नगर (1), भक्ती नगर, पिसादेवी रोड (1), चंपा चौक, शहा बाजार (1), गणेश कॉलनी (1), बुढ्ढी लेन, कबाडीपुरा (1), होनाजी नगर (2), सिडको (3), सावंगी (1), सुरेवाडी (1), भगतसिंग नगर (2), जालान नगर (1), हर्सुल परिसर (4), अविष्कार कॉलनी (1), एन सात सिडको (1), बाबा पेट्रोल पंपाजवळ (1), मथुरा नगर, सिडको (1), नागेश्वरवाडी (1), सिडको एन सहा (2), तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी (3), बालाजी नगर (2), हनुमान नगर (3), भानुदास नगर (3), संजय नगर (3), गजानन नगर (10), विष्णू नगर (2), न्याय नगर (2), एन आठ, सिडको (2), रेणुका नगर (1), पुंडलिक नगर (2), न्यू हनुमान नगर (1), ज्योती नगर (1), मिल कॉर्नर (2), जय भवानी नगर (2), बेगमपुरा (1), उस्मानपुरा (3), नाथ नगर (1), जिन्सी बाजार (5), हर्षल नगर (1), सिडको एन अकरा (1), सिडको एन तेरा (2), सिडको एन दोन (2), विशाल नगर (2), हडको एन बारा (1), जाधववाडी (3), सिडको एन सात (3), सिल्म मिल कॉलनी (1), न्यू विशाल नगर, गारखेडा (1), जुना बाजार (7), काबरा नगर, गारखेडा (2), छत्रपती नगर, बीड बायपास (3), हिंदुस्तान आवास (2), अजब नगर (1), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), सिडको (1), टाऊन सेंटर (1), जिजामाता कॉलनी (1), घृष्णेश्वर रुग्णालयाजवळ (1), गुरूदत्त नगर (4), शिवाजी नगर (3), सातारा परिसर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
जिल्हा माहिती कार्यालय औरंगाबाद महाराष्ट्र शासन Jun 27, 2020
