महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्व तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे निषेध नोंदविण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सोमनाथ धुत, किसनराव लोटके सर, अशोक बाबर, निर्मलाताई मालपाणी, अँड. शारदाताई लगड, अरिफ पटेल आदी

अहमदनगर । भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय
व्यक्तिमत्व तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध नोंदविण्यात आला.जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे सोमनाथ धुत, किसनराव लोटके सर, अशोक बाबर, निर्मलाताई मालपाणी, अँड. शारदाताई लगड, अरिफ पटेल आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले आहे अत्यंत खालच्या भाषेत टीका करणार्‍या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला व खा. पवार हे देशाची आदरणीय व्यक्तिमत्व आहे देशावर व राज्य वर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी सक्षमपणे भूमिका मांडून संकटातून बाहेर काढण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा पवार यांनी केलेल्या विविध कार्याबद्दल जनतेसमोर स्तुती केलेली आहे अखंड 50 वर्षे त्यांनी देशाच्या व राज्याच्या विकासात योगदान दिलेले आहे भाजप आमदार पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर आणला आहे त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शरद पवारांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे : आरिफ पटेल

भाजपाने विधानपरिषदेत नूतन आमदार म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या खांद्यावर धुरा ठेवताच, प्रसिद्धीत येण्यासाठी एखाद्या मोठ्या नेत्यास टार्गेट केल्याने लगेच नावलौकिक होईल, या आशेने देशाचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्याचा उद्योग पडळकर यांनी केला. याचा आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तीव्र निषेध करीत आहोत, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आरिफ पटेल यांनी केले.राज्यातून भाजपा पायउतार होताच काही राजकीय नेतेमंडळी काहीबाही बरळत आहेत. त्यामध्ये या आणखी एका बाळाचा जन्म झाला आहे असे वाटते. सध्या पावसाळा सुरू असल्याने बेडूक उड्या मारणारच, अशी टीका आरिफ पटेल यांनी केली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांची उंची केवढी आहे हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. शरद पवारांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. हा आरोप म्हणजे लहान तोंडी मोठा घास आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात अहोरात्र काम करणार्‍या आदरणीय व्यक्तिमत्त्वांवर टिपण्णी करताना आपण काय बोलतो याचे भान ठेवणे गरजेचे आहे, अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांची शिकवण आहे. अशा नेत्यावर बेछूट अश्‍लाघ्य आरोप करीत कोणी काहीही बोलत असले तर राज्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही,असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आरिफ पटेल यांनी दिला आहे.