अहमदनगर (दि २५ जून २०२०): जिल्ह्यात आज ०६ जणांना डिस्चार्ज तर १२ नव्या #कोरोना रुग्णांची भर.अहमदनगर शहर ०४, संगमनेर ०२,श्रीरामपूर ०२,राहाता ०१,पारनेर ०२ (पैकी एक मुंबई) नगर ग्रामीण ०१ (मुंबईहून आलेला) ॲक्टिव रुग्ण संख्या ६८. एकूण बरे झालेले रुग्ण २६०

आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 340 झाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील ०६  कोरोनाग्रस्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर, आज जिल्ह्यात आणखी बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.


*नगर शहरातील वाघ गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, ४५ वर्षीय आणि ५० वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षे युवक कोरोना बाधित. सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील.*सुपा (पारनेर) येथील ५६ वर्षीय महिला कोरोना बाधीत. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी झाल्या होत्या दाखल*चंदनपुर (राहाता) येथील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल.*संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील ४६ वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील ५० वर्षीय महिला कोरोना बाधित. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी केले होते दाखल.*श्रीरामपूर येथील ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल.*श्रीरामपूर  तालुक्यातील महांकाळ वडगाव येथील ७६ वर्षीय महिला कोरोना बाधित.*ठाणे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे.*कळवा (मुंबई) येथील ४० वर्षीय पुरुष कोरोना बाधित. मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून मुंबई पोलिस दलात कार्यरत.खडकवाडी येथील पोलिसासह ठाण्याहून हे दोघे एकत्र अहमदनगर येथे आले होते.


*(स्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)*

12:04 PM · Jun 25, 2020