
आज जिल्ह्यात आणखी १० नवीन रुग्णांची भर पडली आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 314 झाली
अहमदनगर (दि २४ जुन २०२०) : नगर शहरातील 08 आणि जामखेड तालुक्यातील जवळे येथील एक आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. शहरातील तोफखाना 3 नालेगाव वाघ गल्ली 1 सिद्धार्थनगर येथील 4जणासह अहमदनगर जिल्ह्यात आज बुधवारी आणखी 10 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.अहमदनगर शहरातील 8 रुग्णांसह जामखेड येथील 1 व संगमनेर येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.यात तोफखाना येथील 80 वर्षीय आणि 59 वर्षीय पुरुष तर एका 22 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नालेगाव येथील 22 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे.तसेच सिद्धार्थनगर येथे 8 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे.
जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन
11:51 AM · Jun 24, 2020
