
झेंडीगेट येथील 54 वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा
अहमदनगर (21जुन २०२०) *संगमनेर तालुक्यातील ७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित.संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण. संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित. दिल्ली नाका येथील 42 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष, भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह.
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील 30 वर्षीय पुरुष भोयरे पठार येथील 28 वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह.यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे झाली लागण.अहमदनगर शहरातील झेंडीगेट येथील 54 वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा.*
*अकोले तालुक्यातील कोतूळ येथील 48 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह.*
*दरम्यान, आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील ०८ रुग्णांना आज मिळाला डिस्चार्ज. कोरोनावर मात करून परतले घरी. नगर शहरातील ०४, राहाता येथील ०३ आणि संगमनेर येथील ०१ रुग्ण बरा. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २४५.*
जिल्हा आरोग्य यंत्रणा अहमदनगर महाराष्ट्र शासन
