अहमदनगर (दि.२०/६/२०२०) : न्यूज़ 18 इंडिया चैनलवर अँकर आमिश देवगन या समाज कंटकाने देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असलेले अजमेर येथील जगप्रसिद्ध सूफीसंत हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहे.) यांच्या बद्दल आवमानकारक शब्द प्रयोग केल्यामुळे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या नव्हे तर सर्व धर्मिय भारतीयांच्या भावना दुखावल्या मुळे गुन्हा दाखल करणे बाबत एक निवेदन अहमदनगर युवा फाउंडेशन च्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर.

अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली इतर धर्मियांच्या भावना दुखविण्याचा अधिकार आमिश देवगन याला कोणत्या संविधानीक कायदाव्दारे देण्यात आला

दि १६ जुन २०२० रोजी न्यूज़ 18 इंडिया च्या सायं 7:30 च्या दरम्यान “आरपार” या विशेष कार्यक्रमात अँकर “अमिश देवगण” या समाजकंटकाने अजमेर येथील जगप्रसिद्ध सूफीसंत सर्व धार्मियाचे श्रध्दास्थान हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहे.) यांच्या बद्दल अपशब्दाचा प्रयोग करून समाज भावना भडकावली असुन आमिश देवगण हा नेहमीच विशेषता मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाबाबत बदनामी कारक शब्दाचे वारंवार प्रयोग आपल्या कार्यक्रमात करत असतो. अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली इतर धर्मियांच्या भावना दुखविण्याचा अधिकार आमिश देवगन याला कोणत्या संविधानीक कायदाव्दारे देण्यात आला आहे. असा सवाल सर्व सामान्यांच्या मनात उद्भवत असुन देशात संविधान सर्वासाठी सारखेच आहे. ही भावना रुजविणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे निवदेना व्दारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निरदर्शनास आणुन देण्यात आलेले असुन,सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या अजमेर येथील जगप्रसिद्ध हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहे.) जगविख्यात सूफीसंताच्या विरुद्ध अपशब्द वापरून बदनामी करण्याच्या हेतुने शब्द प्रयोग करून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या नव्हे तर सर्व धर्मिय भारतीय, अतुट श्रद्धा असलेल्या भाविक भक्तांचे सुफिसंताच्या अवमानामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत.

न्यूज़ 18 इंडिया या न्यूज़ चॅनेलचे सीईओ राहुल जोशी, आणि मालक यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा मागणी

अशा समाजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी निवेदन व्दारे मागणी अहमदनगर युवा फौंडेशन चे पदाधिकारी यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत केलेली असुन तसेच न्यूज़ 18 इंडिया या न्यूज़ चॅनेलचे सीईओ राहुल जोशी, आणि मालक यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा व चॅनेलची मान्यता ताबडतोब रद्द करण्यात यावी आशी मागणी अहमदनगर युवा फाउंडेशन च्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अलतमश जरीवाला, उपाध्यक्ष शरीफ सय्यद, साहिल सय्यद, सय्यद शाहफैसल, वाहिद शेख, अज़ीम शेख आदीं उपस्तिथ होते.