अहमदनगर (पारनेर) दि २० जुन २०२० : विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक न झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक २२ जुन २०२० रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन केले आहे. दिलेल्या निवेदनानुसार अरुण रोडे यांनी म्हटले आहे कि वारंवार तक्रार करून आणि या तक्रारीच्या निर्मूलनासाठी उपोषण करूनही मला न्याय मिळाला नाही आणि सदरहू मागण्या ह्या सामाजिक प्रश्नाबाबत आहेत आणि त्यामुळे या तक्रारीबाबत कुठलीही कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलेली नाही . बोगस खरेदी खत फेरफार घोटाळा आणि खोटे कागदपत्र करून फसवणूक करणाऱ्या व्यक्ती, कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अरुण रोडे यांनी केली आहे.