अहमदनगर (दि १९ जून २०२०) : सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता तसेच मोटारसायकलवर डबलसीट जाणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई केली असून या कारवाईत शहरातील 15 ते 20 जणांविरुद्ध कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी मास्क न लावता काही नागरिक विना मास्क फिरत आहेत. या कारवाईत गुरूवारी (दि.18) काही जणांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये वैभव राजमल मुनोत (रा. आगरकर मळा),सय्यद शकील हमीद (वय-49, रा. इंपिरीयल चौक), मोईन गफ्फार बागवान (रा. पिरशाह खुंट), सय्यद नोमान नसीर (वय-22, रा. हातमपुरा), महेश रावसाहेब लोखंडे (वय-26, हातमपुरा),सागर अनिल गुगळे (वय-34, रा. अर्बन बँक रोड), मुद्दसर चाँद शेख (वय-26, रा. सर्जेपुरा), अभिजित मिलिंद भिंगारदिवे (वय-23,रा. माळीवाडा) हे परिसरात मास्क न वापरता तसेच मोटारसायकली वरून डबलसिट विनाकारण फिरून शासनाच्या आदेशाचा भंग करताना आढळुन आले.या प्रकरणी त्यांच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 188, 262 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.लॉकडाऊनच्या काळात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे सुमारे 4 ते साडेचार हजार गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्यांचे दोषोरोपपत्र न्यायालयात सादर न झाल्याने अद्याप सदर गुन्हे प्रलंबीतच आहेत. या गुन्ह्यात दंडात्मक कारवाई होत असल्याने गुन्हा घडण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे असे दिसते.