
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आरिफ पटेल व प्रदेश उपाध्यक्ष शेख जावेद यांची उर्जामंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी
अहमदनगर : गेल्या तीन महिन्यांपासून देशासह राज्यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे छोटे-मोठे दुकानदार, कारखानदार यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत; तसेच सर्वसामान्य व गोरगरीब वीज ग्राहकांना कामधंदा व व्यवसाय नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे व त्यांचे वीज कनेक्शन कट करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा सरचिटणीस शेख आरिफ पटेल व राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शेख जावेद सिमला यांनी उर्जामंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.सध्या व्यवसाय धंद्याबरोबरच नोकरी करणार्या लोकांना व हातावर पोट असणार्या नागरिकांना पोट भरणेही जिकिरीचे झाले आहे. त्यात वीज बिल कुठून भरणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून ना. तनपुरेसाहेबांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. ना. तनपुरे म्हणाले, आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ग्राहक हिताचा योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
