ऊर्दू भाषा ही कोणत्याही जात-पात प्रांतची नसून जागतिक एकात्मतेची आहे हे गुलज़ार साहेबांनी सिध्द केले : के सी.खुराणा

संगमनेर :- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व गंगा जमनी संस्कृती ची ओळख असलेले जेष्ठ साहित्यिक  लोकप्रिय ऊर्दू शायर ‘आंनद मोहन जुत्शी ‘ अर्थात गुलज़ार दहेल्वी यांचे नुकतेच दिल्ली येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अवध्या ऊर्दू जगात दुःखाची छाया पसरली.त्यांचा जन्म ७ जुलै १९२६ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक  कवी संमेलन मध्ये भाग घेवुन श्रोत्यांची मने जिंकली, ऊर्दू पुस्तके लिहिली,त्यात प्रामुख्याने “गुलज़ारे गज़ल”, “कुल्लीयाते गुलज़ार” “सायन्स की दुनिया”जगभरात अत्यंत लोकप्रिय ठरले.हुस्टन अमेरिका येथून गुलज़ार साहेबांचे जवळचे स्नेही श्री.के सी.खुराणा यांनी श्रध्दांजली अर्पण करतांना सांगितले की ऊर्दू भाषा ही कोणत्याही जातपात प्रांतची नसून हे गुलज़ार साहेबांनी सिध्द केले.म्हणुनच ते शायरी मध्ये लोकप्रिय झाले.

गुलज़ार साहेबांनी अनेक प्रसिद्ध साहित्य प्रसिद्ध केले : अब्दुल्ला चौधरी

अब्दुल्ला चौधरी यांनी आपल्या श्रध्दांजली संदेशात म्हटले की गुलज़ार साहेबांनी अनेक साहित्य प्रसिद्ध केले व ते सर्व अत्यंत लोकप्रिय आहेत त्यांचे वडील पंडीत त्रिभुवन नाथ जुत्शी हे दिल्ली युनिव्हर्सिटीत अरबी व फारसी चे प्राध्यापक होते त्यांना “ज़ार दहेलवी” म्हणुन ओळख होती.व आई ब्रिज रानी जुत्शी ऊर्दू कवित्रि ‘बेज़ार दहेलवी’ म्हणुन ओळख होती.

ऊर्दू चा एक अनमोल हिरा निखळला : शेख ईदरीस

आपल्यातुन ऊर्दू चा एक अनमोल हिरा निखळला असुन त्यांच्या सारखा जगप्रसिद्ध बहुभाषिक लोकप्रिय शायर होणे नाही अश्या शब्दात जवाहरलाल नेहरु ऊर्दू  सेंटरचे अध्यक्ष शेख ईदरीस यांनी श्रध्दांजली अर्पण केली.दया शंकर नसीम,पंडीत ब्रिज नारायण, पंडीत दत्तात्रय कैफी,रधुपती सहाय,फिराख गोरखपुरी, सर्व ऊर्दू शायर ह्या सर्वांबरोबर आदरणीय गुलज़ार दहेलवीचां नांव ऊर्दू साहित्यात कायम स्मरणात राहिल अश्या शब्दात सय्यद असिफ अली यांनी श्रध्दांजली अर्पण केली.संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद भाऊ गाडेकर मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सय्यद दिलावर,रशीद गुरुजी,शाहनवाज बेगमपुरे, न्यु चांद सुलताना ऊर्दू हायस्कूल चे चेअरमन राजमोहमद शेख, दस्तगीर शाह, इत्यादींनी श्रध्दांजली वाहिली.