अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा सरचिटणीस व सामाजिक कार्यात सतत स्वत:ला झोकून दिलेले आरिफ पटेल (मेंबर) यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यपदीराष्ट्रवादीकडून घेण्यात यावे, अशी मागणी शहरातील काही सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्था व काही पत्रकार मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना इ-मेलद्वारे केली आहे.आरिफ पटेल हे प्रामाणिकपणे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम करीत आहेत.

माजी प्रशासकीय अधिकारी संघटनेतर्फे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन

माजी प्रशासकीय अधिकारी संघटनेतर्फे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन अहमदनगर शहरातील माजी प्रशासकीय अधिकारी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून शहरात विविध सामाजित कामात अग्रेसर आहे आणि या संघटनेच्या प्रत्येक कामात काहीही अडचण आली आणि कोणत्याही प्रकारच्या सामाजिक उपक्रमात राष्ट्रवादीचे नेते आरीफ पटेल (मेंबर) यांनी नेहमीच आम्हाला साथ दिल्याचे आणि प्रत्येक कार्यात नेहमीच आमच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात असे माजी प्रशासकीय अधिकारी संघटनेचे सचिव निवृत वाहतुक प्रादेशिक परिवहन अधिकारी शाह एन सय्यद यांनी सांगितले.

याबरोबरच मुकुंदनगर भागातील विविध नागरी समस्या आणि आलेल्या अडचणींसाठी अहमदनगर महानगरपालिकेपासून मंत्रालयापर्यंत जनसामान्यांची मागणी आरीफ पटेल यांनी नेहमीच पोहचविण्याचे काम केले अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जिल्हा समाज कल्याण अधिकारी रफीक मुन्शी यांनी दिली. रफीक मुन्शी यांनी सांगीतले की आरीफ पटेल हे सामाजिक कामात आपले सर्वस्व झोकून देत नेहमीच राष्ट्रवादी पक्षातर्फे अहमदनगरच्या जनसामान्यांची काम करीत असतात.

अहमदनगर वैद्यकीय सेवा संघतर्फे आरीफ पटेल यांच्या उमेदवारीसाठी निवेदन

अहमदनगर शहर आणि संपूर्ण तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी नेते आरीफ पटेल यांचा विविध सामाजिक कामांमध्ये नाव घेतला जातो अशी माहिती वैद्यकीय सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.रिजवान अहमद यांनी दिली आणि नेहमीच गरीब-गरजू आणि जनसमान्यांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी विविध सरकारी योजनांमार्फत डॉक्टर आणि रुग्णांचा समन्वय साधत गरीब रुग्णांचे वैद्यकीय समस्या सोडविण्यासाठी नेहमीच धडपड करणारे राष्ट्रवादीचे नेते आरीफ पटेल यांना विधानपरिषदेवर उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी वैद्यकीय संघटनेचे सचीव डॉ.शेख ईम्रान यांनी निवेदनाद्वारे केली.

याबरोबरच सामाजिक कार्यातही हिरिरीने भाग घेऊन सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी झटत असतात. गोरगरीबांना सहकार्य करणे तसेच लॉकडाऊनमध्ये अनेक गरीबांना धान्य व इतर मदत त्यांनी केलेली आहे व करीत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून आरिफ पटेल यांना संधी द्यावी. मुस्लिम समाजाला प्रा. असीर सर यांच्यानंतर आजपर्यंत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. हा समाज सतत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देत असल्याने याचा विचार करून एका सच्च्या कार्यकर्त्याला आरिफ पटेल यांना संधी देण्यात यावी,अशी मागणी अनिल राऊत, प्रशांत गायकवाड,जोसेफ पारधे, सरवर तांबटकर,अन्सार शेख,हबीब खान यांच्यासह मुकुंदनगर येथील आरिफ पटेल मित्रमंडळाने केली आहे.