
मुंबई (दि. १२ जुन २०२०) – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली असून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“धनंजय मुंडे यांचा एक रिपोर्ट निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांना कोणतीही लक्षणं जाणवत नसून श्वसनाचा त्रास होत आहे. यासाठीच आम्ही त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं असून तयारी पूर्ण झाली आहे. ते फायटर आहेत लवकरच बरे होतील आणि पुन्हा एकदा सक्रीय होती असा विश्वास आहे,” असं यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं.
