अहमदनगर (जामखेड) – राज्यात खासगी शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केलेला असतानाच सरकारी शाळांसाठी काय? हा प्रश्‍न पुढे येत आहे. मात्र कर्जत जामखेड मधील 458 शाळांचा प्रश्‍न
आमदार रोहित पवार यांनी सोडवला आहे. आ. पवार यांच्या पुढाकारातून व झोहो कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या दोन तालुक्यांतील पहिली ते सातवीपर्यंतचे 27 हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे पर्व सुरू झाले. येथील सरकारी शाळांतील विद्यार्थी आता डिजिटल पद्धतीने शिकणार आहेत.खासगी शाळांप्रमाणेच अधुनिक पद्धतीने येथील शिक्षक मोबाईलवर वर्ग चालवतील अन् मुलांच्या हजेरी पासून धडा गिरविण्यापर्यंत व गृहपाठा पासून ते अगदी परीक्षे पर्यंत सारे काही शाळे सारखेच असेल.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी संकल्पना राज्यात राबवण्या सारखी असल्याचे मत व्यक्त करीत पवार यांचे कौतुक केले

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अशी संकल्पना राज्यात राबवण्या सारखी असल्याचे मत व्यक्त करीत पवार यांचे कौतुक केले.आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आमदार पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेडमध्ये सुरू केलेल्या डिजिटल शाळांचे ऑनलाइन उद्घाटन केले. यावेळी झालेल्या वेबिनारमध्ये आमदार पवार यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी,झोहो कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेंबू, संचालक देव आनंद, नगरचे जिल्हा परीषद अध्यक्ष, उपाघ्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह कर्जतजाम खेड तालुक्यातील निवडक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये आमदार होण्यापूर्वी व झाल्यापासून शिक्षणावरती अधिक भर दिला आहे. यापूर्वीही त्यांनी इंटरॅक्टिव्ह लर्निंग संच देऊन विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागवली होती.