मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिन्दोसिता हमारा

अहमदनगर : कोरोना संकटात पुन्हा घडले माणुसकीचे दर्शन मुकुंदनगर भागातील रहिवासी किशोर पवार (वय ७०) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी घरचे २ लोकां शिवाय लॉक डाउन आणि कोरोना संकंटांमुळे कोणीच नव्हते अशा संकटसमयी पॉपुलर फ़्रंट ऑफ़ इंडिया सोशल संस्थेचे जुबेर शेख,इंजिनिअर मुबीन,जिया शेख हे मुस्लिम बांधव या हिंदू गृहस्थाच्या अंतिम संस्कारासाठी धावून आले.

घरी अंबुलेंन्स पासून अंत्यविधीची सर्व विधी पार पाडत पुन्हा अहमदनगरलाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.शायर अल्लामा इक्बाल यांनी लिहिलेले शेर है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़ अहल-ए-नज़र समझते हैं उस को इमाम-ए-हिंद आज सार्थ ठरले असल्याचे दिसले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या या तरुणांचे शहरातील विविध स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

आओ मिल कर क़दम बढ़ाओ ख़ुद जागो औरों को जगाओ

हिन्दू मुस्लिम सिख ईसाई सब का दुख सुख एक है भाई

किशोर पवार हे सदगृहस्थ होते आम्ही हे अंत्यविधी केले म्हणजे काही उपकार केले नसून आमचे कर्तव्य पार पडले आहे इस्लाम सांगतो शेजारी राहणारे मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो ते उपाशी झोपले आणि तुम्ही पोटभर जेवून झोपले तर तुम्ही केलेले सर्व पुण्य कर्म व्यर्थ आहे अशी शिकवण देणारा इस्लाम हा काही कोणत्याही धर्माचा द्वेष शिकवत नाही आणि कोणत्याही माणुसकीच्या वाटेवर अडसरहि आणत नाही

इंजिनीयर मुबीन जहागीरदार