
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अरिफ पटेल यांनी ऊर्जा व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली मागणी
अहमदनगर : येथील मुकुंदनगर भागातील रस्ते हॉटस्पॉट होता त्यामुळे पत्रे लावून बंद करण्यात आले होते. सदर रस्ते वाहतुकीसाठी खुले करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अरिफ पटेल यांनी ऊर्जा व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली या निवेदनात पटेल यांनी म्हटलं; मुकुंदनगर फकीरवाडा आणि गोविन्दपुरा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला होता या कालावधीत नवीन रुग्ण आढळला नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या भागातील हॉटस्पॉट उठविला परंतु २ महिने झाले तरी या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंदच आहेत त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे रस्ते बंद असल्याने एकाच रस्त्यावर गर्दी होत आहे व वाहतुकीची कोंडी होते.त्यामुळे पत्रे काढून ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर आपण योग्य ती कार्यवाही करून मुकुंदनगरच्या जनसामान्य नागरिकांसाठी योग्य [पाऊले उचलावीत अशी मागणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना या निवेदनाद्वारे आरिफ पटेल व सहकाऱ्यांनी केली आहे
