मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कोरोना लढाईला निश्चितपणे बळ मिळणार आहे तसेच डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ₹६०,००० ऐवजी ₹७५,०००

आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹७०,००० ऐवजी ₹८५,०००

इतर भागातील MBBS डॉक्टर्सना ₹५५,००० ऐवजी ₹७०,०००

इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹६५,००० ऐवजी ₹८०,००० मानधन देण्यात येईल.