
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधव माता भगिनींना शुभेच्छा देतानाच या कोरोना संकट काळात आपण ईद निमित्त घराबाहेर न पडता घरातच आपली प्रार्थना करावी राज्यातील देशातील आणि जगातील हे संकट दूर होण्यासाठी दुवा करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले
शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल

मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं कि पुढच्या १५ दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे महाराष्ट्रात ५० हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत. लॉकडाउन एकदम करणं हे जसं चुकीचं आहे तसंच लॉकडाउन एकदम उठवणंही चुकीचं ठरेल. हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल.
