
#अहमदनगर जिल्ह्यात #कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यात आपण बर्यापैकी यशस्वी ठरलो आहोत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करीत खबरदारी घेतली तर आपण या संकटावर निश्चितपणे मात करु पालकमंत्री

#अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. @ICMRDELHI यांच्या अधिकृत मान्यतेनंतर #कोरोना संदर्भातील चाचण्यांना सुरुवात होईल. पालकमंत्री @mrhasanmushrif यांनी या प्रयोगशाळेला भेट देऊन पाहणी केली.


अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील टेस्ट लॅबला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्यासह भेट दिली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते.
