अहमदने ठेवला पवित्र रमझानचा पहिला रोजा

अहमदनगर : पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून फक्त पाच वर्षे वय असलेल्या सय्यद अहमद मतीन याने रमजानच्या  विसाव्या रोजा दिनी आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवला.सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी 4.30 वाजेपासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत रोजा च्या नियमांनुसार अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाह (ईश्वर) प्रति श्रद्धा व्यक्त केली.
          भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह कडे या मुलाने साकडे घातले पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल सर्व क्षेत्रातील  मान्यवरांकडून अहमद चे कौतुक होत आहे, तसेच पिरशाहखुट यंग पार्टी-ट्रस्ट, अहमदनगर युवा फाउंडेशन, चाँद तारा यंग पार्टीचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई जरीवाले यांचा अहमद हा नातू आहे.