
कोरोना संक्रमणातून आपण बाहेर नक्कीच पडू परंतू श्रमीक मजुर आणि त्यांच्या लहान लहान पोराबाळांची होणारी हजारो किलोमीटरची पायपीट आणि त्यांच्या पायांसह आलेली मनावरची सुज कधी कमी होईल का? असा प्रश्न सध्या देशभरातील बीकट आणि भयावह परिस्थिती पाहिल्यावर उभा राहिला आहे.मजुरांच्या पायपीटीला उगाच काहीही नाव देऊन त्यांना परप्रांतीय आणि पळपुळे म्हणणार्यांनी स्वतःच्या आत्म्यास मानवता आणि मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो असल्याचे विसरता कामा नये.

तुमच्या राजकारणाचा गुळआंबा करण्यासाठी हे मजूर तुमच्या राज्यात आश्रय घेऊन नव्हते आणि तुमचे राजकारण संपणार यासाठी ते जात नाहीय त्यांच्यावर सध्या कोरोनापेक्षाही महाभयंकर अशा असुराचा हल्ला होत आहे तो म्हणजे बेरोजगारीचा असुर आणि या बेरोजगारी आणि भुकेने मरण्यापेक्षा त्या कोरोनाची भीती या मजुरांच्या समोर काडीमात्र म्हटले तर वावगं ठरणार नाही.या मजदुरांच्या मजबुरीला काहीही नाव देऊन त्यांना पलायन करणारे, पळपुटे म्हणणारे आणि परप्रांतीय म्हणून त्यांना हिणवणार्यांनी माणुस हा शेवटी माणुसच असतो आणि माणुसकीला ना कोणती जात,ना कोणता प्रांत आणि ना कोणती हद्द या श्रमीक मजुर आणि रोजगारासाठी शेकडो आणि हजारो किलोमीटर आलेले माणस लॉकडॉऊनच्या पहिल्या पर्वानंतरच त्यांच्या मनात अनेक शंका-कुशंका वाढीस लागल्याचे आपण पहातच होतो आणि त्यानंतर लॉकडॉऊन 2.0 ची भर पडली त्यामुळे येथे राहून आपल्या आणि कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ नये आणि कोरोना आधीच आपण उपासमारी आणि बेरोजगारीनेच बळी पडण्यापेक्षा या मजुरांना आपआपल्या जन्मगावांकडे जाणे पसंत केले.

लॉकडॉऊन 3.0 मध्ये सध्या काही दिवस बाकी असतांनाच आता पंतप्रधानांनी लॉकडॉऊन 4.0 चे संकेत नाही निर्देशच दिले त्यामुळे मजदूर हे काही पळ काढणारे पळपुटे नाहीत तर मजदूर हे मजबुर झालेले आहेत.देशभरातील राज्य सरकारे आपल्या परिने त्यांच्या राज्यांमधील मजुरांना आणण्यासाठीविशेष रेल्वे आणि बसेसची व्यवस्था करीत आहेतच तथापि यासर्व उपाय योजनांची
माहिती घराची ओढ लागलेल्या आणि कधी तुमची रेल्वे सुरु होईल आणि कधी ती बस निघेल या शंका-कुशंकेच्या मानसिकतेतून आपण पायीच आपल्या गावी जाऊ या इच्छेने हजारोंच्या संख्येने मजुर,श्रमीक माणसे त्यांच्या कुटंबासह पायपीट करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.हायवेवरून जातांना पोलीसांच्या चौकी आणि चौकश्यांना सामोरे जावे लागेल ही बाब ओळखून शेवटी ही माणसे रेल्वे रुळांच्या वरून जीवास धोका पत्करुन पायपीट करीत आहेत.अशातच काही दिवसांपूर्वी घडलेली औरंगाबादची दुर्घटनाही मनाला सुन्न करणारीच घडली 16 मजुरांच्या घरी पोहचण्याचा प्रवास मालगाडीच्या चाकांखालीच संपला आणि ह्या सर्व मजदुरांची मजबुरी काय आणि किती गंभीर
स्वरुपाची आहे याचे विवेचन करणेही पाहिजे तितके सोपे नाही.कोरोना महामारीने अख्खे जग हादरलेले असतांना आणि रोजच्या मितीस या व्हायरसच्या संक्रमीत रुग्ण संख्येत वाढ होत असतांना आणि बळींची संख्याही वाढीस लागलेली असतांना आपल्या भारतातील मजुर,श्रमीक,मजदूर बेरोजगारीने त्रस्त झालेले माणस आणि त्यांंची सध्या सुरु असलेली पायपीट मनाला त्रस्त करणारीच अशी आहे.विविध ठिकाणी रणरणत्या उन्हात या मजुरांच्या लहान-लहान पोर बाळांची सुरु असलेली हेळसांड आणि कित्येक रस्त्यांवर या मजदुरांच्या लहानग्यांची अनवाणी पायांनी सुरु असलेली पायपीट लवकरात लवकर संपेल एवढीच इश्वरचरणी प्रार्थना.

