
सार्वजनिक संपर्क टाळा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आवाहन
#अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ०७ रुग्ण वाढले. कोरोना बाधिताची संख्या आता ५१. संगमनेर येथील एक महिला आणि धांदरफळ (ता.संगमनेर) येथील ०६ जण असे एकूण ०७ जण कोरोना बाधित. विनाकारण घराबाहेर पडू नका. सार्वजनिक संपर्क टाळा. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे आवाहन.
संगमनेर शहरातील काही भाग तसेच कुरण व मौजे धांदरफळ बु (ता.संगमनेर) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून घोषित.या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी शनिवार,दि. ०९ मे रोजी स.०६ वाजेपासून ते दि.२२ मे, २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद

संगमनेर शहरातील ईस्लामपुरा, कुरण रोड, बीलालनगर,अपनानगर,पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर आणि लगतचा २ किमी परिसर प्रतिबंधित. नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यावर प्रतिबंध
