
पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर यांनी दिली.
