पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 94 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

यापैकी #पुणे जिल्हयातील 2 हजार 395 बाधीत रुग्ण असून 680 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 587 आहे. कोरोनाबाधित एकूण 128 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 88 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.