#अहमदनगर जिल्ह्यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात दि.४ मे ते ०७ मे, २०२० या कालावधीत विविध बाबींना सवलती. #लॉकडाऊन च्या मूलभूत नियमांचे पालन करणे राहणार बंधनकारक. अत्यावश्यक सेवा वगळता या कालावधीत सायंकाळी ०७ ते सकाळी ०७ या वेळेत मात्र निर्बंध कायम.

सवलत -म.न.पा. , न.पा. हद्दीतील बाजारपेठ/बाजार संकूलातील जीवनावश्‍यक वस्‍तू विक्री दुकाने, एकल,वसाहतीलगत असणारी, निवासी संकूलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि,अशा भागात एखाद्या गल्‍लीत/रस्‍त्‍यालगत 5 पेक्षा अधिक दुकाने असल्‍यास फक्‍त जीवनावश्‍यक वस्‍तू विक्री दुकाने सुरु

सवलत- कोल्‍ड स्‍टोरेज,वेअर हाऊसेस, खाजगी सुरक्षा सेवा, इमारतींचे देखभालीकरीता सहाय्यभुत ठरणा-या व्‍यवस्‍थापन सुविधा,  वीजनिर्मिती, वितरण आणि पारेषण यांचेकरीता आवश्‍यक असणा-या इलेक्‍ट्रीक ट्रान्‍सफॉर्मर्सची दुरुस्‍ती करणारे दुकाने /वर्कशॉप

सवलत – खाजगी कार्यालयमध्‍ये आवश्‍यकतेनुसार 33% पर्यंत कर्मचा-यांसह सेवा सुरु  इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमे, आयटी माहिती व त्‍यावर आधारीत सेवा, ग्रामपंचायत स्‍तरावरील सीएसपी सेंटर्स,  वर्तमानपत्रे व मासिक यांचे व्‍दारवितरण ग्राहकाच्‍या पूर्वसंमतीने अनुज्ञेय

सवलत- #कृषी उपकरणे हारवेस्टर व तत्‍सम यांना  राज्‍यांतर्गत व आंतरराज्‍य वाहतूकीची परवानगी. शेत माल वाहतुक व विक्री, बियाणे, खते व किटक नाशके यांचे उत्‍पादन, साठवणुक, वाहतुक व विक्री.

सवलत- कृषि विषयक सर्व कामे,तुर, कापूस व हरभरा खरेदी केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांचे व्यवहार. फळे,भाज्‍या, धान्‍ये यांचा लिलाव होतो, अशा कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये केवळ घाऊक व्‍यापारी, अधिकृत/नोंदणीकृत खरेदीदार, शेतकरी यांनाच प्रवेश

सवलत-सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम: बालके/दिव्यांग/मनोरुग्ण/जेष्ठ नागरीक/बेघर/निराधार महिला/विधवा यांची  निवारागृहे,  निवासगृहे  सुरु राहतील.अल्पवयीन मुलांची निवारागृहे व निरीक्षणगृहे सुरु राहतील

निवृत्तीवेतन व  भविष्‍य निर्वाह निधी विषयक सेवा सुरु. सर्व अंगणवाडी सेविका या दर पंधरा दिवसाला  बालके,  महिला, स्तनदा मातायांचा पोषण आहार घरपोच देतील.

माहिती कार्यालय अहमदनगर महाराष्ट्र शासन 2:32 PM · May 4, 2020