Anil Deshmukh Press Conference Photo

#पालघर घटनेस कृपया जातीय रंग देऊ नये- गृहमंत्री अनिल देशमुख

#पालघर जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी, माणुसकीला काळिमा फासणारी. घटनेनंतर पोलिसांनी जंगल,डोंगरात लपलेल्यांना केवळ ८ ते १० तासांत १०१ व्यक्तींना घेतले ताब्यात.त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही.या घटनेस कृपया जातीय रंग देऊ नये- गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांचे समाज माध्यमाद्वारे आवाहन

ही घटना घडलेली जागा दुर्गम व आदिवासी भागात. या परिसरात रात्रीच्या वेळी वेषांतर करून मुले पळवणारी टोळी येत आहे अशा अफवा होत्या. त्यातून हे घडले असावे. याचा तपास सीआयडी कडे तर विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी सुरू गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले

ही वेळ राजकारणाची नाही. सर्वांनी एकत्र येऊन #कोरोना विरुद्ध लढा द्यावा- गृहमंत्री

सध्या आपली #coronavirus विरुद्ध लढाई सुरू. पोलीस, आरोग्य विभागासह संपूर्ण राज्यच लढाईत व्यस्त. परंतु, या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी. ही वेळ राजकारणाची नाही. सर्वांनी एकत्र येऊन #कोरोना विरुद्ध लढा द्यावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले