मुकुंदनगरकरांना थोडासा दिलासा द्यावा
अहमदनगर शहर आणि जिल्हा कोणत्या झोनमध्ये वर्ग करण्यात आले आहे याबाबत अनेक शंका,कुशंका उपस्थित करण्यात येत आहे तीन रंगांच्या वर्गीकरणांमध्ये रेड अती धोकादायक,ऑरेंज कमी धोकादायक आणि ग्रीन एकदम सेफ अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार असल्याच्या बातम्या पसरल्या खर्या तथापि याबाबत सत्य किती आणि आपल्या भाषेत म्हणुया फेक न्युज किती?असा प्रश्न उपस्थित झाला.सध्या जागतिक महामारी कोरोना म्हणजेच कोविड-19 च्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी विविध देशांमध्ये अनेक पावले नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी उचलण्यात येत आहेत आणि ते अत्यावश्यकच आहे यामध्ये लॉकडॉऊन हा विषय बहुतेक देशांनी कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत कार्यक्षम असा उपाय म्हणून आत्मसात केला.लॉकडॉऊन म्हटल की संचारबंदी,जमावबंदी आणि कर्फ्यु जे तुम्ही आम्ही यापुर्वी अनुभवले आणि ज्याबाबत थोडी माहितीही आपल्याला होती,परंतू लॉकडॉऊन हा जागतीक डिकक्शनरीमधून आलेला शब्द बर आला तसा पाहुणा म्हणून आला होता सुरवातीला अस वाटल.किंबहुना कोरोना पळविण्यासाठी आमच्या देशात आलेला हा लॉकडॉऊन पाहुणा किमान पाहुणचार घेऊन म्हणजे 21 दिवसानंतर निघून जाईल अस वाटत असतांना याच मुक्काम आणखीणच वाढला आणि आपल्याला सेल्फ आयसोलेशन,क्वारनटाईन करत बाहेर या लॉकडॉऊननेच कब्जा केल्या सारख वाटायला लागल.जागतीक कोरोना महामारीचा प्रसार आणि प्रादुर्भाव लक्षात घेता याची गंभीरता लक्षात येते आणि जागतीक महासत्ता म्हणविल्या जाणार्या अमेरिका सारख्या बलाढ्य राष्ट्रात या कोरोनाच्या महामारीने माजविलेले थैमान अत्यंत विदारक स्वरुपाचे आहे,स्पेन,इटली आणि जगाच्या जवळ जवळ सर्वच देशांमध्ये कोरोनाने अनेक बळी घेतले अनेकांना याची लागण झाली आणि अनेक या आजारातून बरे होतानाही आपण पाहिले.या व्हायरसची कोणतीही लस अजुनही अस्तीत्वात नाही याचा संशोधन जागतीक स्तरावर सुरु आहेच परंतू भारतात अत्यंत मोठ्या प्रमाणावर तयार होणार्या हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा उपयोग कोरोना आजाराशी काही अंशा होऊ शकतो त्यामुळे अमेरीकेने भारताला या औषधाची अलीकडेच मागणी केली भारताने या औषधावर निर्यातबंदी फार पुर्वी लावलेली होती परंतू संकटसमयी अमेरिकेच्या मदतीच्या हाक ऐकून भारताने ही बंदी हटवली आणि या औषधाची पहिली खेप नुकतीच अमेरिकेली प्राप्त झाली आणि या निमीत्ताने अमेरिकेने मोदींचे आभारही मानले.हा जागतीक मुद्दा तोही समजणे आणि माहिती असणे तितकेच गरजेचे आणि आता आपले शहर अहमदनगर याबाबतही माहिती करुन घेणे तेवढेच महत्वाचे आहे.रेड,ऑरेंज आणि ग्रीन झोन हे केंद्रामार्फत जाहीर होणार असल्याची माहिती नामदार विश्वजीत कदम यांनी देऊन आता तरी कुठेही कोणताच झोन नसल्याचेच स्पष्ट केले त्यामुळे अहमदनगरला कोणतेच झोन सध्या नाही आणि अजुन कुठेही याबाबतीत जाहीर झालेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या रुग्णसंख्येवर अशा प्रकारचे झोन केंद्र किंवा राज्य शासनातर्फे जाहीर होण्याचे संकेत मात्र आहेत.
अहमदनगरमधील उपनगर मुकुंदनगर बद्दलचा विषय
आता अहमदनगरमधील उपनगर मुकुंदनगर बद्दलचा विषय येथे लॉकडॉऊन संपूर्ण भारतात लावला तेव्हा पासून येथेही लागला परंतू मागील काही दिवसांपासून या भागास हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आणि हा भाग संपुर्णतः सील्ड करण्यात आला यामध्ये अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकानेही, भाजीपाला,किराणा आदी सर्वच्या सर्व फक्त लॉक डॉऊन नाही तर सील्ड म्हणजेच बंद करण्यात आले असून त्यामुळे अत्यंत भयावह आणि विदारक अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.मुकुंदनगरमध्ये कोणीही आत प्रवेश करु शकत नाही आणि तेथून कोणीही बाहेर येऊ शकत नाही.यामुळे काही अत्यावश्यक सेवा म्हणजे भाजीपाला पाकीटे मनपा मार्फत पन्नास रुपये प्रती पाकीट विक्री पुरवठा केला जात आहे त्यात दोन बटाटे,तीन टमाटे आणि थोडी गवार आणि हिरवी मिरची अस काही तरी पाकीट तोही पाहिजे त्या प्रमाणात नाही आणि पाहिजे त्या ठिकाणी वेेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या असंख्य तक्रारी या ठिकाणातील नागरिकांकडून केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणाची परिस्थितीचा पुर्नआढावा घेणे अत्यंत गरजेचे असून मुकुंदनगर सील्ड बाबत काही अंशी शीथील करणे कामी निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. मुकुंदनगर मधील ज्येष्ठ नागरीक, रुग्णांसाठी आणि उच्च रक्तदाब, हृद्यविकार,शुगर अशा रुग्णांच्या बाबतीत याठिकाणी काही ओपीडी आणि मेडीकल स्टोअर्स उघडण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कालचीच घटना पाहता एका मुकुंदनगर वासियाने त्याच्या आईच्या हृहयविकाराच्या औषधीसाठी त्यांनाच ट्विटर मार्फत कळविले आणिं कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर जिल्हाधिकार्यांनी त्याची औषधे त्याला घरपोहचही केली परंतू सर्वच मुकुंदनगरसाठी हे आपल्याला करणे शक्य होणार नाही आणि त्यामुळे काही अंशी का होईना आपण या भागातील लॉकडॉऊन कमी करावे आणि जनसामान्य मुकुंदनगरकरांना थोडासा दिलासा द्यावा हीच जनसामान्य मुकुंदनगरकरांची आपल्याकडून अपेक्षा हॉटस्पॉट करण्यामागील कारणे आणि आपल्याला या भागास सील्ड करण्यामागेही वैध आणि आवश्यक अशीच कारणे असतील परंतु जान है तो जहान है म्हणत घरी थांबलेल्यांच्या जीवासाठीच योग्य निर्णय घेण्यात यावा.एस.एम.आदिल कार्य.संपादक दर्शक
