Health Minister Rajesh Tope Meeting Photo

मुंबईत एकाच दिवसात आढळले २१८ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या ही ९९३ झाली आहे. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या १५४७ झाली आहे.  त्यातले ९९३ रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईच्या दृष्टीने ही नक्कीच चिंतेची बाब ठरते आहे. मुंबईत लॉकडाउनचे नियम कठोर केले जाणार आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची केंद्राकडे मागणी

Health Minister Rajesh Tope Meeting Photo

पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे

आज विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची केंद्राकडे मागणी केली.
N95 Mask File Photo

राज्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किटस्, एन ९५ मास्क यांबाबत केंद्र शासनाकडे मागणी

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. मुंबईमधील वाढ चिंताजनक असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राज्य शासनामार्फत अधिक प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. कंटेनमेंट सर्वेक्षण कृतीयोजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध बाबींची माहिती दिली.राज्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किटस्, एन ९५ मास्क यांबाबत केंद्र शासनाकडे मागणी यापूर्वीच नोंदविली असून हे सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिल्यास त्याचे वितरण राज्यभरात करणे सोईचे होईल असे सांगितले.
PPE SUITE FILE PHOTO
देशात, राज्यात ज्या पीपीई किटस् उत्पादक कंपन्या आहेत त्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे जेणे करून त्यांना उत्पादन करणे शक्य होईल, अशी मागणी करतानाच रॅपीड चाचणी कधी करायच्या या बाबतीत केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचनांसोबतच त्यासाठी लागणारे किटस् देखील उपलब्ध करून देणेबाबत मागणी केली.