RAJESH TOPE FILE PHOTO

डॉक्टर तसंच आरोग्य क्षेत्रालील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार

सर्व डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवाची बाजी लावून सध्या रुग्णालयांमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टर तसंच आरोग्य क्षेत्रालील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानणारं एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढता आहात अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलं आहे. तसंच आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या अशी विनंतीही केली आहे.
INDIAN DOCTORS FILE PHOTO

तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचं पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. समस्त देशवासिय आपापल्या घरात कुटुंबियां समवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्त स्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत.

RAJESH TOPE

पुन्हा मी आपणा सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करतो,

पुन्हा मी आपणा सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या,असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा.
Doctors Medical And Para medical Staff File Photo