मुंबईत रविवारी करोनानं आणखी एक बळी घेतला. करोनाचा संसर्ग झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेला करोनासदृश्य लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यानंतर करोना तपासणीत महिलेला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, करोनामुळे मुंबईत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्गांचा आकडा वाढत असताना मृतांची संख्येतही धिम्या गतीनं वाढू लागली आहे. यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यु झालेल्या मुंबईत रविवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती दिली.