
मुंबई : दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा नुकतीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पेपर कधी घ्यायचा ते ३१ मार्च रोजी जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे.


देव न करो चुकुन 31st नंतर एखाद्याला काही कमी जास्त साधा सर्दी खोकला झाला अन ३१नंतर ते स्टूडंट एकत्र पेपरला आले तर ते जास्त घातक होईन गेर समज अथवा रिस्क वाढेल शेवटचा पेपर होता घ्यायला हवा होता. होस्टेलचे विद्यार्थि शिक्षक वेगवेगळया तालक्यातुन, राज्यातुन पुन्हा १ पेपरसाठी एकत्र येनार. पालक म्हणून मला हे अयोग्य वाटल.
LikeLike