
प्रतिबंधात्मक आदेशान्वये अनेक नगरकरांवर पोलीस कारवाई करण्याचे निर्देश यावेळी कलेक्टर साहेबांनी दिले.शहरातील विविध भागात पोलीस बंदोबस्तासह संपूर्ण शहरातील लॉक डॉऊनवर स्वतः कलेक्टरांनी अॅक्शन घेतले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्यासाठी अत्यंत कडक कारवाई अहमदनगर जिल्ह्यात करण्यात येत असून शहरात स्वतः जिल्हाधिकार्यांनी फिरून आणि अनेक ठिकाणी स्वतः ग्रांऊंडवर उतरत दुकाने बंद करण्यासाठी आवाहन केले.
कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच कलेक्टर साहेबांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ यांना कारवाईचे आदेश दिले.नागरिकांनी विनाकारण बाहेर पडु नये प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

