शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रमआस्थापना,अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅब, दवाखाने, रेल्वेस्टेशन, एस.टी.स्टॅण्ड, बसथांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षाथांबे.
अहमदनगरमध्ये एकूण कोरोना बाधिताची संख्या आता दोनवर नागरिकांनी गर्दी टाळावी
जिल्ह्यात आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा NIV चा अहवाल.एकूण बाधिताची संख्या आता दोनवर. नागरिकांनी गर्दी टाळावी. दक्षता घ्या.सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवू नका. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा-राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आवाहन
जिल्हयात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजनास बंदी. मंदीर, मस्जिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरीकांचे प्रवेशासाठी बंद राहतील.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाह स्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी
बंदी आदेशातून वगळण्यात आलेल्या बाबी-इयत्ता 10 वी/12 वी तसेच राज्य व केंद्र शासनाकडून घेण्यात येणा-या सर्व स्पर्धा परिक्षा, विदयापिठ/विश्व विदयालयाच्या परीक्षा देणारे विदयार्थी व संबंधीत शैक्षणीक काम पाहणारी व्यक्ती. प्रसारमाध्यमांची कार्यालये