अहमदनगर प्रेस क्लब व भैरवनाथ आय हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रचिकित्सा शिबिर

अहमदनगर प्रेस क्लब व भैरवनाथ आय हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन करताना डाॅ. सारिका बोरुडे व डाॅ. रावसाहेब बोरुडे. समवेत भारती झोटींग, सुरेखा गारडे, मुक्ता वाघमोडे, निलम खराडे, दिप्ती जाधव आदी.

अहमदनगर : उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. पत्रकारांनी डोळ्यांना गाॅगल्स वापरण्यासारख्या उपाययोजना करण्याची गरज असते. महिलांनी डोळ्यांच्या किरकोळ आजाराकडेही दुर्लक्ष करू नये,असे मत भैरवनाथ आय हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. रावसाहेब बोरुडे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिलादिनानिमित्त अहमदनगर प्रेस क्लब व भैरवनाथ आय हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चाैपाटी कारंजाजवळील हाॅस्पिटलमध्ये पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन आज झाले. या वेळी ते बोलत होते. हाॅस्पिटलच्या संचालिका डाॅ. सारिका बोरुडे तसेच उपस्थित पत्रकारांच्या पत्नी भारती झोटींग, सुरेखा गारडे, मुक्ता वाघमोडे, निलम खराडे, दिप्ती जाधव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग कुलकर्णी, दिलीप वाघमारे यांच्या हस्ते डाॅ. बोरुडे दाम्पत्याचा स्मृतिचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला.डाॅ. सारिका बोरुडे म्हणाल्या, `डोळ्यांना चष्मा लागत असला, तरी बहुतेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंबर वाढत जातो. तसेच डोळ्याखालील काळे वर्तुळ, डोळ्यातील कोरडेपणा आदींकडे महिलांनी आवर्जुन लक्ष द्यायला हवे. या शिबिरात 60 जणांची नेत्रतपासणी करून त्यांना औषध वाटप करण्यात आले.प्रास्तविकात प्रेस क्लबचे सचिव मुरलीधर कराळे यांनी प्रेस क्लबने केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विश्वस्त अशोक झोटिंग, निशांत दातीर, तसेच मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, विठ्ठल शिंदे, दीपक रोकडे आदींनी शिबिराला भेट देवून मार्गदर्शन केले.  
सूत्रसंचालन प्रेस क्लबचे उपाध्यक्ष अरुण वाघमोडे यांनी केले. शिबिर यशस्वीतेसाठी हाॅस्पिटलच्या पूनम पवार, सारिका काळे, रामदास गायकवाड, सुधीर गायकवाड, बिलाल शेख, अजय विधाते, अशोक माने, विशाल तोरणेआदींनी परीश्रम घेतले. दिवसभर अनेक पत्रकारांनी शिबिराचा लाभ घेतला. हाॅस्पिटलच्या वतीने मोफत औषधे देण्यात आले.