
महात्मा गांधींच्या विचारधारेने या देशातून ब्रिटिशांना पाठवले तर या सत्ताधारी सरकारला ही आपण गांधींच्या सत्याग्रहाच्या मार्गाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराने हा कायदा मागे घेण्यासाठी भाग पाडू शकतो . असे आव्हान गांधी भवन चे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी अहमदनगर येथील शाहीनबागेत केले .या देशातील मुस्लीम हे भारतावर असलेल्या प्रेमापोटी भारतात राहिले त्यांना पाकिस्तानात जाण्याचा पर्याय उपलब्ध होता परंतु मौलाना आझाद यांनी त्यांना सांगितले की तुम्ही हे पाकिस्तानला गेलात तर तेथे फक्त मुस्लिम धर्मीय तुम्हाला पाकिस्तानात भेटतील परंतु भारतात राहिलात तर भारतात आपणास मुसलमान बरोबरच सर्व सर्वधर्मीय देशबांधवांची ही भेट होईल .महात्मा गांधींनी फाळणीचा वेळेस मुस्लिमांना उद्देशुन सांगितले की जिन्नाची विचारधारा मान्य करत असतील ते पाकिस्तानला जातील.

गांधी आणी मौलाना आझाद यांच्या विचारधारेला मान्य करतील ते भारतात आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या आपल्या पूर्वजांच्या सर्व इतिहासा बरोबर राहतील तत्कालीन मुस्लिम नेत्याने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला .आता हा कायदा याठिकाणी बीजेपीने केला. ज्या ज्या मतदारांनी तुम्हाला या देशात एवढ्या मोठ्या संख्येने सत्ता दिली .आज तुम्ही त्यांनाच त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न विचारता. तुम्हाला त्यांच्या नागरिकांवर संशय आहे. सर्वात प्रथम तुम्ही देशाच्या पंतप्रधानांनी या देशाचे सत्तेचा त्याग करावा आणि मग निवडणुका घेऊन देशाच्या नागरिकत्वाचा विषय मार्गी लावावा या देशाच्या घटनेने येथे जमलेल्या सर्वांना या देशाचे नागरिक म्हटले आहे त्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द करण्याचा कोणालाही अधिकार नाही या घटनेप्रमाणे देशात कायदा करताना कोणताही कायदा जात धर्म लिंग प्रदेश याच्या आधारावर करता येणार नाही त्यामुळे सध्या केलेला कायदा घटनेची पायमल्ली करणार आहेत त्यामुळे हा कायदा रद्द होईपर्यंत हा लढा असा चालू राहील.

दिल्लीच्या आमच्या माता-भगिनी गेल्या साठ दिवसापासून सातत्याने या सरकारच्या काळा कायदा विरोधात आंदोलन सत्याग्रहाच्या मार्गाने चालू ठेवला आहे त्यांच्या कार्याला समर्थन देण्यासाठी आज अहमदनगर शहरातील सर्व माता भगिनी ने शाहीनबाग आयोजित करून पाठिंबा दिला त्या सर्व शाहीनीना सलाम करतो .अशा शब्दात डॉक्टर सप्तर्षी यांनी कौतुक केले. या सरकारचे धोरण द्वेषाची राजनीति आणि धर्माचे ध्रुवीकरण करून देशात दंगे फसाद करणे हा त्यांचा अजेंडा आहे देशातील मुस्लिमांनी केलेला धर्मांतरण हे मूळचे भारतीय नागरिक असा आहे. अस्पृश्यतेच्या वर्णव्यवस्थेच्या विरोधात या देशात आलेल्या सुफी संतांनी मानवतेचा समानतेचा संदेश देऊन मुस्लिम धर्माचा प्रचार प्रसार झालेला आहे. ते काही परदेशातून आलेले नाहीत त्यांचे या पिढ्यानपिढ्या या देशात गेलेले आहेत. सरकारचं विविध पातळ्यावर झालेल्या अपयशाला झाकण्याकरिता अशा प्रकारचे कायदे आणले आहेत. या कायद्याने फक्त मुस्लिम नाही.तर हिंदू धर्मातील 40 टक्के आदिवासी एसटी एससी ओबीसी यांनाही हा या कायद्याचा दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत .त्यामुळे हा देश हिंदुराष्ट्र कडे नेण्याचा त्यांचा अजेंडा आहे.



