बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जवाहरलाल नेहरू उर्दु सेंटर तर्फे मराठी शाळा न.२ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

संगमनेर:- राज्याचे महसूल मंत्री , प्रदेशाध्यक्ष  व संगमनेर तालुक्याचे शिल्पकार नामदार  श्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जवाहरलाल नेहरू उर्दु सेंटर तर्फे मराठी शाळा न.२ मध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद असिफ अली होते.यावेळी सेंटरचे अध्यक्ष शेख इदरीस मो.शफी यांनी प्रास्ताविक करताना नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विकास कामांचा सुविस्तार उल्लेख केला.

प्रमूख अतिथी अब्दुल्ला चौधरी आपल्या भाषणात म्हणाले कि नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपले वडील आदरणीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श समोर ठेवून राजकारणात समाजकारणात आपली आगळीवेगळी छाप निर्माण केली आहे त्यांना   दिर्घायुष्य लाभावे हिच प्रार्थना मुखधयापक शिरसाठ सर, डोंगरे सर,माळी सर,माजीदखान, तसेच

अध्यक्षीय भाषणात सय्यद असिफ अली यांनी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विकास कामांचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला यावेळी शानु बेगमपुरे,शानु बागवान,रशीद गुरूजी, सय्यद रफीक,शाळेचे अध्यक्ष दस्तगीर शाह, या सर्वांचा हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.शेख ईदरीस यांनी आभार मानले.