
अहमदनगर । प्रतिनिधी -हम फिट तो अहमदनगर फिट असा नारा देत पहाटे कडाक्याच्या थंडीत
सुमारे साडेतीन हजार स्पर्धक मॅक्सिमस अहमदनगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये धावले. समाजाला
आरोग्याप्रती व कॅन्सरविषयक जागृती करण्यासाठी नगर रायझिंग फाऊंडेशन आयोजित व महाराष्ट्र
अॅथेलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवार असून देखील भुईकोट किल्ल्याजवळील अहमदनगर क्लब पहाटेच गर्दीने हाऊसफुल झाले होते. अतिशय शिस्तबध्दरित्या आणि तितक्याच उत्साहात संपूर्ण मॅरेथॉन पार पडली. 21 कि.मी., 10 कि.मी. तसेच 3 व 5 कि.मी.या चार गटांत ही स्पर्धा झाली.ऑलंम्पिक खेळाडू ललीता बाबर, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक सागर पाटील, कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, छायाताई फिरोदिया, आशाताई फिरोदिया, रेखा सारडा, नगर रायझिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धा संयोजक संदीप जोशी, डॉ. सतीश सोनवणे, डॉ.शाम तारडे, अॅड.गौरव मिरीकर, अॅथेलिटिक्स असो.चे दिनेश भालेराव, मनपा नगर रचनाकार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.झुंबा डान्सची धमाल रनर्सनी अनुभवली. तर आर्मीच्या बॅण्ड पथकासह विविध लावण्यात आलेल्या प्रेरक हिंदी गीतांनी रनर्सचा उत्साह वाढवला.मॅरेथॉनच्या प्रारंभी अहमदनगर रायझिंगचे गीत वाजविण्यात आले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी काही महिला चक्क नऊवारी साडी परिधान करुन या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या.तिरंगा ध्वज घेऊन एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आलेले रनर्स या मॅरेथॉनचे आकर्षण ठरले.जगातील अतिशय खडतर मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे भारताचे रनर्स चंद्रकांत पाटील,मनोज देशपांडे, तुकाराम नाईक,सुरेंद्र ब्रम्हे, जस्मीत वधवा,चेतन नवलानी, मीना पोटे
पेसर म्हणून सहभाग लाभला.स्पर्धेच्या समारोपनंतर नगर क्लबच्या मैदानावर लगेचच ऑलंम्पिक खेळाडू ललीता बाबर हिच्या हस्ते रनर्सना बक्षिस देण्यात आले.यामध्ये 21 कि.मी. पुरुष गटामध्ये प्रथम- चांगदेव लाटे (अहमदनगर), द्वितीय- समित भूकेर (बीटीआर), तृतीय- कार्तिक
कुमार (बीटीआर), महिलांमध्ये प्रथम- स्मिता उकिर्डे, द्वितीय-भारती यादव, तृतीय- अनिता
बोथरा (तिन्ही रा. अहमदनगर), तर 10 कि.मी. पुरुष गटात प्रथम-किशोर मरकड (पाथर्डी),
द्वितीय- महेंद्र कुमार, तृतीय-विशाल ढगे, महिलांमध्ये प्रथम- जनाबाई हिरवे (सातारा), द्वितीय- शितल भंडारी (पारनेर),तृतीय- नेहा खान (अहमदनगर) यांनी बक्षिसे पटकाविली. स्पर्धेचा अंतिम व संपूर्ण निकाल 15 दिवसांत जाहीर करण्यात येणारआहे.स्पर्धेचे मुख्य संयोजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, अहमदनगरमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागावी,प्रत्येकाने आरोग्याप्रती जागृत रहावे या उद्देशाने पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉनच्या धर्तीवर हाफ मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. यंदा या सलग सहाव्या वर्षी नगरकरांनी या स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.
आरोग्याप्रती जनजागृतीचे काम फाऊंडेशनने घेतले असून, या चळवळीला नगरकर स्वयंस्फूर्तीने
सहकार्य करीत असल्याचे सांगून,पुढील 2021 ची सातव्या सिझनची हाफ मॅरेथॉन 7 फेब्रुवारी
होणार असल्याचे जाहीर केले.ललिता बाबर म्हणाल्या की,अशा मॅरेथॉन मधूनच मी घडले
आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर रायझिंग फाऊंडेशन घेत असलेले उपक्रम प्रेरणादायी आहे.
