अहमदनगर (प्रतिनिधी) : सहकार महर्षी स्व. सुवालाल गुंदेचा हे तपस्वी होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेले योगदान सहकारासाठी आदर्शवत आणि दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

सहकार महर्षी स्व. सुवालाल गुंदेचा सहकारी पतसंस्थेच्या मार्केट यार्ड येथील मुख्य कार्यालयास ना. थोरात यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष तथा पतसंस्थेचे संचालक मनोज गुंदेचा, आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, चेअरमन ईश्वर बोरा, व्हाईस चेअरमन किरण शिंगी, अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, मर्चंट बँकेचे संचालक संजय बोरा, अर्बन बँकेचे संचालक शैलेश मुनोत, शांतीलाल गुगळे पंडितराव खरपुडे, विनय भांड, शैलेश गांधी, तज्ञ संचालक विशाल गांधी, काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, युवक उपाध्यक्ष विशाल घोलप आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

ना. थोरात म्हणाले की, स्व. सुवालालजी यांनी आमचे वडील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या बरोबर जिल्ह्यात काम केलं. मला देखील त्यांच्या नेतृत्वाखालील टीम मध्ये काम करण्याचं भाग्य लाभलं. सुवालालजींनी बँकेच्या निवडणुकीसाठी पॅनल उभा केला तर उमेदवार कोण आहे हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता सभासद मतदारांना वाटायची नाही. कारण की चांगल्याच  उमेदवारांना संधी देण्याचे काम त्यांनी केलं आणि बँकेचा कारभार आदर्शवत चालवला. 

आज ते हयात नाहीत. मात्र त्यांचे विचार जिवंत आहेत. त्यांचे चिरंजीव मनोज गुंदेचा हे त्यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. पतसंस्थेच्या कोणत्याही कामासाठी मला केव्हाही हाक दिली तर मी निश्चितपणे धावून येईल, अशी ग्वाही यावेळी ना. थोरात यांनी दिली. 
किरण काळे म्हणाले की, स्व. सुवालालजी यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य मला लाभले नाही. परंतु त्यांचे चिरंजीव मनोज गुंदेचा हे काँग्रेस पक्षामध्ये माझे सहकारी म्हणून काम करत आहेत. सुवालालजीं प्रमाणेच प्रामाणिकपणा, निष्ठा, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्यामध्ये तळमळ आहे. जैन समाजाला काँग्रेस पक्षाने कायमच सामावून घेतले आहे. मनोज गुंदेचा आज जैन समाजाच प्रतिनिधित्व काँग्रेसमध्ये समर्थपणे करत आहेत. 

मनोज गुंदेचा म्हणाले की, माझ्या वडिलांची स्व. भाऊसाहेब थोरात यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती. त्यांनी प्रामाणिकपणे समाजाची सेवा केली. आम्हालाही त्यांनी चांगले संस्कार दिले. ना. बाळासाहेब थोरात हे जिल्ह्याचे भूषण आहेत. त्यांचा आणि आमच्या वडिलांचा चांगला स्नेह होता. ना.थोरात यांनी पतसंस्थेला भेट देऊन केलेल्या कौतुकामुळे निश्चितच अधिक चांगले काम करायची ऊर्जा आम्हाला मिळाली आहे. यावेळी गुंदेचा यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा आढावा ना. थोरात यांच्यासमोर मांडला. 

थोरातांनी मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनासाठी यावे चेअरमन ईश्‍वर बोरा यांनी यावेळी ना. थोरात यांना मुख्यमंत्री म्हणून पतसंस्थेच्या प्रस्तावित नूतन वास्तूच्या उद्घाटनासाठी यावे असे प्रतिपादन आपल्या भाषणात केले. यावेळी उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा कडकडाट करत यासाठी थोरात यांना शुभेच्छा दिल्या. राजेंद्र चोपडा यांनी पतसंस्थेची धुरा आता तरुण पिढीने समर्थपणे हाती घेतली असून ती चांगल्या पद्धतीने काम करत आहे असे सांगितले. राजेंद्र गांधी यांनी सहकार क्षेत्रातील बँकिंगला लागलेली कीड स्वच्छ करण्याचे काम आम्ही करीत असल्याचे यावेळी सांगितले. 

यावेळी सुनील भळगट, मेहुल भंडारी, शैलेश चोपडा, संजय गुगळे, मांगीलाल गांधी, संजय गुंदेचा, प्रमोद डागा, ललित गुगळे, मयूर पितळे, संदीप कोठारी, संतोष बोरा, प्रशांत भंडारी, मनोज लुणीया, महेंद्र कांबळे, विजय लोंढे, अजित गुगळे, अतुल गुगळे, किशोर श्रीश्रीमाळ आदी उपस्थित होते.